Subscribe Us

header ads

बीड मतदार संघाचे विद्यमान आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या मातोश्री रेखाताई रवींद्र क्षीरसागर यांचे निधन...

बीड स्पीड न्यूज 

बीड मतदार संघाचे विद्यमान आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या मातोश्री रेखाताई रवींद्र क्षीरसागर यांचे निधन...

बीड प्रतिनिधी-: आ. संदीप क्षीरसागर यांच्या मातोश्री रेखाताई रवींद्र क्षीरसागर यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. रेखा क्षीरसागर यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.रेखाताई रवींद्र क्षीरसागर यांना बुधवारी सायंकाळी अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचवेळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रेखा क्षीरसागर हे बीड जिल्हा परिषदेच्या सदस्य देखील होत्या. त्यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पती रवींद्र क्षीरसागर यांच्यासह आ. संदीप क्षीरसागर, हेमंत आणि अर्जुन ही मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. क्षीरसागर कुटुंबियांच्या दुःखात बीड स्पीड  परिवार सहभागी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा