Subscribe Us

header ads

बीडचे पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांची बदली!

बीड स्पीड न्यूज 


बीडचे पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांची बदली!



बीड प्रतिनिधी-: दि.20 बीड जिल्ह्यातील कायदा-व्यवस्था बिघडल्यामुळे पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांच्याविरोधात लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर  बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा हे रजेवर होते. बुधवारी त्यांच्या बदलीचे आदेश आले असून पुणे शहर पोलीस उपायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.बीड येथील रजिस्ट्री कार्यालयातील गोळीबार प्रकरण, तसेच जिल्ह्यातील अवैध धंदे, अवैध वाळू उपसा, गुटखा,  मटका, पत्त्याचे क्लब यासंदर्भात जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी विधिमंडळामध्ये पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच बीडचा बिहार झाल्याच्याही प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यानंतर पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांना रजेवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर आज बुधवारी (दि.20) पुणे शहर पोलीस उपायुक्त म्हणून राजा रामास्वामी यांना नियुक्ती देण्यात आली आहे. या नियुक्तीचे आदेश शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी काढले आहे. बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा