Subscribe Us

header ads

जायभायेना अति शहाणपणा भोवला; माजलगावचा अतिरिक्त पदभार काढला सहाय्यक अधिक्षक पंकज कुमावत यांच्याकडे कार्यभार

बीड स्पीड न्यूज 


जायभायेना अति शहाणपणा भोवला; माजलगावचा अतिरिक्त पदभार काढला सहाय्यक अधिक्षक पंकज कुमावत यांच्याकडे कार्यभार




माजलगाव प्रतिनिधी-:  उपअधीक्षक सुनील जायभाये व हवालदार शंकर राठोड यांच्यात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात १८ एप्रिल रोजी वाद झाला होता. पोलीस शिपाई एस. एच. राठोड हे कर्तव्यावर असताना दुपारी ४ वा. सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये हे ग्रामीण पोलीस स्टेशनला आले. ते आल्यानंतर त्यांना रीतसर सॅल्युट दिला असता त्यांनी ठाण्याच्या आवारात हे कोण लोक जमा झालेत तुम्ही त्यांना इथे का थांबू दिले असा प्रश्न विचारल्यानंतर अपघातातील गाडीच्या चौकशीसाठी कांही तर कांही लोक हे फिर्याद घेऊन आल्याचे उत्तर राठोड यांनी दिले. अचानकच जायभाये यांचा पारा चढला व त्यांनी येथील बेंच तोडण्याचे फर्मान काढले तसेच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. राठोड यांना तर सर्वांसमक्ष आई बहिणीवर शिवीगाळ करत सिमेंटचे बेंच तोड म्हणू लागले. राठोड यांनी माझा पाय फ्रॅक्चर असल्याचे सांगितले असता तुझा दुसरा पायही फ्रॅक्चर करून टाकील. तुला सस्पेंड करील, मी भोकरदनला असताना अनेकांची वाट लावली आता तुझी पण वाट लावतो म्हणत गलिच्छ शिवीगाळ करून सर्वांसमक्ष अपमानित केले तसेच या सर्व प्रकरणी माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या बाबतीत कांही अनुचित घडले तर त्यास जायभाये हेच जबाबदार असतील आशा आशयाची तक्रार पोलीस शिपाई एस. एच. राठोड यांनी ग्रामीण पोलिसात दाखल केली होती.यानंतर जायभायेंकडील माजलगाव उपविभागाचा अतिरिक्त कार्यभार काढण्यात आला आहे. आता केजचे सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्याकडे माजलगावचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. माजलगाव येथील उपअधीक्षकपद रिक्त आहे. त्यामुळे अंबाजोगाईचे उपअधीक्षक जायभाये यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविला होता.अप्पर अधीक्षक कविता नेरकर हे चौकशी करून अहवाल सादर करणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा