Subscribe Us

header ads

संभाजीनगर'ला तारणार कोण? पिण्याच्या पाण्याची टंचाई,तर दुर्गंधीचाही त्रास; सरकारी पाण्याचे टॅंकर चालू करा अन्यथा टॅंकरचे नागरिकांना पैसे द्या_विशाल सराफ

बीड स्पीड न्यूज 


'संभाजीनगर'ला तारणार कोण? पिण्याच्या पाण्याची टंचाई,तर दुर्गंधीचाही त्रास

सरकारी पाण्याचे टॅंकर चालू करा अन्यथा टॅंकरचे नागरिकांना पैसे द्या_विशाल सराफ


किल्ले धारूर / प्रतिनिधी-:धारूर तालुका अतंर्गत गोपाळपूर संभाजीनगर भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भंटकतीची वेळ आली आहे. प्रशासनाने पिण्याचे टॅंकर मंजूर करून नागरिकांची भंटकतीची वेळ दूर करावी. मात्र, जोपर्यंत भागात सरकारी पाण्याचे टँकर सुरू होत नाही, तोपर्यंत उन्हाळा सुरू होत नसल्याची जाणीव प्रशासनला होत नाही. मात्र, उन्हाळा चालू होऊन  दोन महीने झाले तरी भागात आतापर्यंत सरकारी पाण्याचे टँकर सुरू झाले नसून संभाजीनगर, वडारवाडा, शिक्षक काॅलेनी, भायजळी, गोपाळपूर,येथिल लोकांच्या घशाला कोरड पडण्यास सुरूवात झाली आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे आधी लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने  भागातील जनतेसमोरील अडचणी , तसेच विक्रतीचे पाणी घ्यावे लागत आहे.  महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.प्रशासनाने आम्हाला आमच्या हक्काचे पाणी द्यावे आणि ते जर जमत नसेल तर टँकरचे पैसे द्यावेत. टँकर विकत घेऊन पाणी पिणे हे आता नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळेच 'पाणी द्या, नाहीतर टँकरचे पैसे द्या असी मागणी बाळासाहेब ठाकरे विचारमंच संस्थापक अध्यक्ष विशाल सराफ यांनी केली आहे.यासंदर्भात प्रशासनाने योग्य ती  नियोजन नं केल्यास बाळासाहेब ठाकरे विचारमंच कडून तीव्र आंदोलन केले जाईल, असे बाळासाहेब ठाकरे विचारमंच संस्थापक अध्यक्ष विशाल सराफ यांनी सांगितले.


प्रशासनाने लवकरात लवकर गोपाळपूर, संभाजी नगर, शिक्षक काॅलेनी, वडारवाडा, भागात सरकारी टॅंकर चालू करून जनतेची पाण्यासाठी होणारी धावपळ थाबवावी.तिव्र आंदोलन करण्यात येईल. 

विशाल सराफ
बाळासाहेब ठाकरे विचारमंच संस्थापक अध्यक्ष

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा