Subscribe Us

header ads

कारला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी

बीड स्पीड न्यूज 


उमरी ता. प्र प्रकाश कारलेकर

कारला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांची  १३१ वी भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी



उमरी :- कारला येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा   दिनांक २६ एप्रिल वार मंगळवार रोजी भारतरत्न विश्वरत्न प. पु. बोधीसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांची  १३१ वी भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.त्यावेळी  सकाळी  ठीक  ९:०० वाजता सर्वप्रथम  गावातील सरपंच  उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, व बौद्ध बांधवांच्या वतीने  तथागत भगवान  गौतम  बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून  अभिवादन  करण्यात आले.त्यानंतर सकाळी  ठीक  ९:०५ वाजता  पंचरंगीं ध्वजाचे  ध्वजारोहण  गावातील पोलीस पाटील  यादोजी पाटील पवळे  यांच्या हस्ते  करण्यात आले,व त्यानंतर सामूहिक रित्या त्रिशरन पंचशील ग्रहण  करण्यात आले त्यावेळी गावातील सरपंच  दिलीप पा. पवळे, उपसरपंच उत्तम शिंदे, व्येनकटराव पा. पवळे, पंजाब पा. पवळे,यादोजी पा. पवळे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कोल्हे, शंकर  जाधव, मोहन  कदम, भीम जयंती चे अध्यक्ष साहेबराव पवार,उपाध्यक्ष  देवानंद  कदम, व पत्रकार प्रकाश  कारलेकर, शंकर  कदम,  सटवा कदम, भीमराव  वाघमारे  राजू वाघमारे, माधव वाघमारे, शिवाजी  कदम, यशवंता  हाणवते, संतोष  आढाव, पंडित  कदम, सूर्यकांत कदम, सुमेध  सोनकांबळे, नागोराव वाघमारे  उत्तम वाघमारे,यशवंता कदम  शिवानंद कदम,  प्रकाश कदम, आदी समाज  बांधव  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा