Subscribe Us

header ads

वैद्यनाथ विद्यालयाच्या 1997 च्या बॅचचे स्नेहमिलन उत्साहात संपन्न; माजी विद्यार्थ्यांनी राबविलेले उपक्रम कौतुकास्पद --- दत्ताप्पा ईटके गुरूजी

बीड स्पीड न्यूज 


वैद्यनाथ विद्यालयाच्या 1997 च्या बॅचचे स्नेहमिलन उत्साहात संपन्न
-------------------------------
माजी विद्यार्थ्यांनी राबविलेले उपक्रम कौतुकास्पद ः दत्ताप्पा ईटके गुरूजी
----------------------------------


परळी (प्रतिनिधी):- परळी शहरातील सर्वात जुनी शाळा वैद्यनाथ विद्यालयाची ओळख असलेल्या शाळेच्या 1997 बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा 1 मे 2022 मोठ्या उत्साहात संपन्न झाला.1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त शाळेत सकाळी 8 वाजता ध्वजवंदन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी 1997 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून ध्वजवंदन केले. त्यानंतर शाळेतील विद्यमान शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी 1997 बॅचच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मधल्या सुट्टीत खिचडी खाण्यासाठी स्टिलच्या प्लेटचे वितरण करण्यात आले. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
वैद्यनाथ मंदिर परिसरातील वैद्यनाथ प्रतिष्ठाण हॉलमध्ये 1997 बॅचच्या वतीने दुपारी 12 वा. स्नेहमिलन सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील माजी शिक्षकांनाही आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी श्री दत्ताप्पा इटके गुरूजी, पी.एस.घाडगे सर, श्री मोदी सर, श्री गाडे सर, श्री टी.आर.सर, श्री साठे सर, श्री टिवटणकर, श्री लोढा सर आदी शिक्षक व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात उपस्थित शिक्षकांच्या हस्ते श्री सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करुन आली. त्यानंतर 1997 च्या बॅच मधील मयत गुरूजन शिक्षक व मयत विद्यार्थ्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर उपस्थित गुरूजनांचा शाल, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, वैद्यनाथाची प्रतिमा भेट देवून विद्यार्थ्यांच्या हस्ते गुरूजनांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित गुरूजन शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दत्ताप्पा ईटके गुरुजी म्हणाले की, 1997 च्या बॅचचे विद्यार्थी आमच्या हातून घडले ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. हे विद्यार्थी एकत्र येवून राबवत असलेले विविध उपक्रम कौतुकास्पद आहेत असे सांगून ते म्हणाले की, या माजी विद्यार्थ्यांनी अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केलेली आहे, मयत सहकारी मित्राच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे हे ही त्यांनी आवर्जून सांगितले. प्रास्ताविक अविनाश कापसे या विद्यार्थ्यांने केले.त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांचाही गुरूजनांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेत घडलेले प्रसंग सांगितले, आठवणी सांगितल्या, हा स्नेहमिलन सोहळा अविस्मरणीय असल्याचेही अनेक विद्यार्थी, विद्यार्थीनींनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.रविंद्र ईटके, सारीका गायकवाड यांनी केले. शेवटी संदीप जाधव याने आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.दरम्यान, 1997 बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येवून मयत माजी विद्यार्थी किशोर स्वामी याच्या मुलीच्या नावे एक लाखाची एफडी यापूर्वी करुन दिलेली आहे. तसेच माजी विद्यार्थी शेषेराव लोखंडे याच्या मुलीच्या विवाहासाठी मदत म्हणून एक एलईटी टी.व्ही. भेट दिला आहे. यापुढेही अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची गरज पडल्यास मदत करण्याचा संकल्पही करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा