Subscribe Us

header ads

राज ठाकरेंवर औरंगाबादेत गुन्हा दाखल; प्रक्षोभकविधान केल्याप्रकरणी सिटीचौक पोलिसांची कारवाई

बीड स्पीड न्यूज 


राज ठाकरेंवर औरंगाबादेत गुन्हा दाखल; प्रक्षोभकविधान केल्याप्रकरणी सिटीचौक पोलिसांची कारवाई


औरंगाबाद, 3 मे -:  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेला पोलिसांनी अटी-शर्थींसह परवानगी दिली होती. त्यानुसार औरंगाबाद पोलिसांचं राज ठाकरेंच्या सभेकडे आणि त्यांच्या भाषणावर करडी नजर होती. या प्रकरणात औरंगाबाद पोलिसांनी एक अहवाल तयार केला होता आणि तो अहवाल पोलीस महासंचालकांना पाठवण्यात आला होता. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कलम 116, 117 आणि 153 अ, भादवि 1973 सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 सुधारीत 31 जुलै 2017 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्यात राज ठाकरे यांच्यासोबतच राजीव जेवळीकर आणि इतर आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद पोलिसांनी सभेला परवानगी देताना ज्या अटी-शर्थी घातल्या होत्या त्यांचं उल्लंघन झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा