Subscribe Us

header ads

पती-पत्नीने केला वृद्धाचा खून! मंजरथ बसस्थानकावरील घटना

बीड स्पीड न्यूज 


पती-पत्नीने केला वृद्धाचा खून! मंजरथ बसस्थानकावरील घटना

माजलगाव| प्रतिनिधी-: पैशाच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून नवरा-बायकोने एका ६५ वर्षीय इसमाचा चाकुने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना माजलगाव तालुक्यातील मंजरथ बसस्थानकात काल रात्री घडली. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मारुती चुरामन घटे (वय ६५ वर्षे, रा. मंजरथ ह.मु. केसापुरी ) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. मयत घटे यांनी आरोपी राजाभाऊ सर्जेराव गायकवाड यांना ५ लाख रुपये हातउसने दिले होते. ते पैसे मारुती यांनी गायकवाड यांना मागितले. या कारणावरून काल रात्री सात वाजता मंजरथ बसस्थानकासमोर दैवशाला राजाभाऊ गायकवाड़ हिने मयत घटे यांना पकडले आणि राजाभाऊ सर्जेराव गायकवाड याने आपल्या हातातील सुरीने घटे यांच्यावर सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या घटे यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात गु.र.नं. ९२ / २०२२ कलम ३०२, ३४ भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा