Subscribe Us

header ads

उमरी नगरपरिषदेमार्फत शहरातील महिला बचत गटांना नोंदणी प्रमाणपत्र वितरण

बीड स्पीड न्यूज 

नांदेड जिल्हा प्रतिनीधी प्रकाश  कारलेकर 

उमरी नगरपरिषदेमार्फत शहरातील महिला बचत गटांना नोंदणी प्रमाणपत्र वितरण


उमरी: नगरपरिषद उमरी अंतर्गत दिनदयाळ अत्योदय - राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत सन 2021-22 अंतर्गत स्थापित एकुण 22 महिला बचत गटांना नोंदणी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. उमरी नगरपरिषद कार्यालय येथे दिनांक 26/05/2022 रोजी शहरातील महिला बचत गटांना मा.मुख्याधिकारी श्री.गणेश रामचंद्र चाटे यांनी बचत गटांना नगर परिषदे अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देवुन त्यामध्ये सन 2021-22 अंतर्गत एकुण 16 महिला बचत गटांना बँकेकडुन रु.24.00 लक्ष एवढा निधी लोन च्या माध्यमातुन उपलब्ध करुन देण्यात आला. तसेच 03 महिने पुर्ण करणाऱ्या एकुण 17 महिला बचत गटांना रु.1 लक्ष 70 हजार एवढा फिरता निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निधीतुन बचत गटांच्या माध्यमातुन विविध उपजिविकेच्या साधनाद्वारे उत्पन्न वाढ करण्याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच सन 2022-23 अंतर्गत मानव विकास कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त महिला बचत गटांनी लाभ घ्यावे असे आवाहन करण्यात आले.त्यावेळी उमरी नगर परिषद कार्यालय अधिक्षक, श्री.अर्जुन गव्हाणे, स्थापत्य अभियंता श्री.संतोष मुंढे,जोतिराम जाधव लेखापाल, वरिष्ठ लिपीक श्री.गणेश मदने,सचिन गंगासागरे, सुरेश मळवरकर,रमाबाई करपे, चेंदकांत श्रीकांबळे, संगीता हेमके, गंगाधर पवार, आकाश खदारे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री.गायकवाड पि.एम., समुदाय संघटक श्री.खंदारे नरेंद्र,बनसोडे मॅडम मा.वि.म च्या सहयोगीनि नगरपरिषद अधिकारी/कर्मचारी व महिला बचत गटातील सदस्या यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा