Subscribe Us

header ads

मुलीच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आईची गळफास घेऊन आत्महत्या!

बीड स्पीड न्यूज 

मुलीच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आईची गळफास घेऊन आत्महत्या!


बीड| प्रतिनिधी-: मुलीच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आईने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बीड शहरात शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेने खळबळ उडाली. दरम्यान, आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही तर पोलिसांतही उशीरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरु होते.सुवर्णा सुनिल जाधव (४५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्या बीड शहरातील कॅनॉल रोडवरील विश्वनगर भागात वास्तव्यास आहेत. गुरुवारी २६ मे रोजी त्यांच्या मुलीचा विवाह झाला होता. शुक्रवारी सकाळी ११ वाजता त्यांनी राहत्या घरी दोरीने गळफास घेतला. कुटुंबिय, नातेवाईकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. दरम्यान, सुवर्णा यांनी आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा