Subscribe Us

header ads

पिंपळनेर पोलीस कोमात चोरटे जोमात; कुक्कडगाव परिसरात बंधाऱ्यावरील दोन मोटारी चोरीस

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

पिंपळनेर पोलीस कोमात चोरटे जोमात; कुक्कडगाव परिसरात बंधाऱ्यावरील दोन मोटारी चोरीस

वाकनाथपुर| प्रतिनिधी-: कुक्कडगाव येथील बंधाऱ्यावरील दोन मोटारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. काही स्टाटर वर दगड घातले या पूर्वी ही अश्या घटना घडल्या आहेत.यापुर्वीही सात मोटारीसह वायर चोरट्यांनी चोरून नेले होते. चोरट्यांविरोधात कठोर कारवाई होत नसल्याने बंधारा परिसरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत.कुक्कडगाव येथील बंधाऱ्यावर मोटारी बसवलेल्या आहेत. रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरटे मोटारी चोरून नेतात. यापुर्वी सात मोटारीसह वायर चोरीला गेले होते. त्याचा अद्यापही तपास लागलेला नाही. तोच रात्री दोन मोटारी चोरीला गेल्या आहेत. पिंपळनेर पोलिसांना कोणतेही चोर सापडत नाहीत पिंपळनेर पोलीसांचा कोणाला धाक राहिलेला नाही कित्येक अवैध धंदे पिंपळनेर परिसरात सुरू आहे. पोलीस उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. म्हाळस जवळा, नाथापुर येथे दोन दिवसा पूर्वी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या जवळ चोरी झाली होती. पिंपळनेर पोलीस फक्त बध्यांची भूमिका घेत आहे. चोरट्यांविरोधात कठोर कारवाई होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा