बीड स्पीड न्यूज
आरोग्य विभागातील गैरव्यवहार प्रकरणात भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण केल्याबद्दल उपसंचालक, जिल्हाशल्यचिकित्सक यांच्यावर प्रशासकीय कारवाई करा:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
कोरोना कालावधीत कंत्राटी कर्मचारी भरतीत गंभीर अनितमितता ,दोषीसिद्ध आधिका-यांवर गुन्हे दाखल करा.
____
बीड जिल्हा रूग्णालयात कोविड १९ कालावधीत वाढीव मनुष्यबळापेक्षा आधिकचे मनुष्यबळ जिल्हारूग्णालय डीसीएच बीड ६३ नर्सिंग हाॅस्टेल ५३ डीसीएच आयटीआय ०५ असे एकुण १२१ अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करून गंभीर प्रशासकीय अनियमितता तत्कालीन मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित कुंभार यांनी वेळोवेळी निर्देशित केलेल्या सुचनांचे पालन न करताच भरती करण्यात आली. रूग्णसंख्या कमी झाल्यानंतर मनुष्यबळ कमी करणे आदेशित असताना करण्यात आले नाहीत.दि.४ जुन २०२१ ते ११ जुन २०२१ नुसार बंद करण्यात आलेल्या संस्थामधील कंत्राटी कर्मचारी एकुण २१६ यांना देखील कामावरून कमी केले नाही त्यामुळेच सदरील कंत्राटी कर्मचारी यांचे मानधन देण्यास अडचणी उदभवल्या परीणामी कर्मचाऱ्यांनी जिल्हारूग्णालय परीसरात उपोषण, निदर्शने करत आहेत. संबधित प्रकरणात डाॅ.राठोड, अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक यांनी वाढीव मनुष्यबळापेक्षाही अधिकचे मनुष्यबळ नियुक्त करून गंभीर प्रशासकीय अनियमिता करत ४४,३९९२ /- अतिरिक्त खर्च करून शासनास भुर्दंड सहन करावा लागला असून शिस्तभंगविषयक कारवाईस पात्र असुन डाॅ.सुखदेव राठोड, डाॅ.महेश माने, डाॅ.ढाकणे दोषीसिद्ध असुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे कळवले असुन संबधित प्रकरणात उपसंचालक डाॅ.एकनाथ माले यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण केली असून कंत्राटी भरती मध्ये सुद्धा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आलेला असून पात्र उमेदवार डावलुन भरती करण्यात आलेली आहे. संबधित प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करा.
कोरोना कालावधीत खर्चाचे ऑडीट करा ;खरेदी गैरव्यवहार प्रकरणात गुन्हे दाखल करा
बीड जिल्ह्य़ातील कोरोनाकाळात आरोग्य विभागाला दिलेल्या कोट्यावधी रूपयांच्या खरेदीमध्ये मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार करण्यात आला असून आरोग्य विभागातील वरिष्ठ आधिकारी तसेच कर्मचारी, नातेवाईक यांच्या नावाने बोगस एजन्सीज दाखवुन आर्थिक गैरव्यवहार करण्यात आलेला असून सीसीटीव्ही,रेमडीसिवीर इंजेक्शन, औषधे खरेदी, जिल्हा हिवताप कार्यालयातुन बोगस प्रमाणपत्र वितरण, प्रेरणा प्रकल्पातील गैरव्यवहार, जीवनामृत रक्तपेढीतील मनमानी कारभार, खरेदी कंत्राटामध्ये गैरव्यवहार प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
बोगस कामांची देयके,अहवाल देण्यास टाळाटाळ जिल्हाधिकारी, उपआयुक्त यांच्या आदेशाची अवमानना प्रकरणात डाॅ.एकनाथ माले, डाॅ.सुरेश साबळे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करा
आरोग्य विभागातील विविध गैरव्यवहार प्रकरणात पुराव्यासह तक्रारीनंतर जिल्हाधिकारी बीड तसेच विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या आदेशानंतर सुद्धा चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यास जाणीवपुर्वक विलंब केला जात असून संबधित प्रकरणातील अहवाल जिल्हाधिका-यांचे लिखित आदेश असताना सुद्धा तक्रारदारांना कळविण्यास टाळाटाळ केली जात देयके देऊ नयेत अशा तक्रारीनंतर सुद्धा बोगस कामांची देयके देण्यात आली असून एकंदरीतच भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण केल्याबद्दल उपसंचालक डाॅ.एकनाथ माले व जिल्हाशल्यचिकित्सक डाॅ.सुरेश साबळे यांची विभागीय चौकशी करून प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
0 टिप्पण्या