Subscribe Us

header ads

संत - महंतांनी सलीम जहाँगीर यांना दिले आशिर्वाद हिंदू - मुस्लिम ऐक्याची परंपरा कायम ठेवा - ह.भ. प.लक्ष्मण महाराज मेंगडे

बीड स्पीड न्यूज 


संत - महंतांनी सलीम जहाँगीर यांना दिले आशिर्वाद

हिंदू - मुस्लिम ऐक्याची परंपरा कायम ठेवा - ह.भ. प.लक्ष्मण महाराज मेंगडे

बीड (प्रतिनिधी) रमजान ईदच्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा आगळा वेगळा ईद मिलापचा कार्यक्रम यशस्वी ठरला सर्व स्तरातून कार्यक्रमाचे कौतुक होत असून दिग्गज संत महंतांनी फेटा बांधुन सलीम जहाँगीर यांना आशीर्वाद दिले तर मोठे मन करून एकमेकांच्या सण उत्सवात सहभागी होऊन संस्कृतीचे जतन करावे व हिंदू मुस्लिम ऐक्याची अखंड परंपरा कायम ठेवा असे आवाहन ह.भ. प.लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी  केले.बीड येथे  रमजान ईद निमित्ताने भाजपा नेते सलीम जहाँगीर यांच्यावतीने ईद मिलाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या निमित्ताने श्री. क्षेत्र नारायण गड संस्थानचे महंत ह.भ.प. शिवाजी महाराज, श्री. क्षेत्र मंजिरी चे महंत महादेव महाराज माऊली,  श्री. क्षेत्र गोरक्षनाथ टेकडीचे महंत ह.भ.प. नवनाथ महाराज ,  पटांगण संस्थानचे ह.भ.प.पाटांगणकर महाराज शास्त्री ,  बंकट स्वामी संस्थान नेकनुरचे महंत ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे, बीड येथील रामगड संस्थानचे ह.भ.प. योगीराज महाराज, ह.भ. प. नानासाहेब महाराज, ह.भ. प.सुरेश महाराज,सी.ए.बी.बी.जाधव,या संत - महंतांसह असंख्य हिंदू - मुस्लिम  बांधव उपस्थित होते. देशाच्या बळकटीकरण आणि संघटित करण्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता महत्त्वाची भूमिका बजावते. विविध धर्म, पंथ, पोशाख इ. विविधतेतून नटलेल्या आपल्या परंपरेचा अभिमान राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवत असतो व यामूळेच ते आपसात अनेक फरक असूनही एकमेकांशी एकोप्याने राहतात. विविध जात आणि समुदायांचे लोक आहेत, ज्यांचे जीवनशैली, संस्कृती, भाषा आणि रीतिरिवाज पूर्णपणे भिन्न आहेत परंतु सर्व लोक एकत्र राहतात कारण सर्व लोक राष्ट्रीय एकतेच्या स्त्रोताशी जोडलेले आहेत. नेमक्या याच कारणांमुळे सलीम जहाँगीर यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमाची रचना,नियोजन करून सर्व धर्मियांना आपल्या घरी आमंत्रित करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. संत महंतांच्या वतीने सलीमभाईंचे फेटा बांधून स्वागत करण्यात आले. अशा प्रकारच्या एकात्मतेचे दर्शन घडवुन आणल्याबद्दल धन्यवाद दिले. या राष्ट्राच्या मातीतील आपण सारे समान लेकरे आहोत.एकमेकांच्या सुख दुःखाच्या प्रसंगी आपणच एकमेकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहात असतो म्हणूनच हिंदू - मुस्लिम, बौध्द, शिख, जैन , इसाई,पारसी आणि देशातील सर्वच अशा धर्मियांनी हातात हात घालून काम करण्याची गरज असल्याचे मत सलीम जहाँगीर यांनी व्यक्त केले. सलिमभाई हे सातत्याने अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करत असल्याबद्दल अनेकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा