Subscribe Us

header ads

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ,मार्फत राबविण्यात येणाऱ्या एन,एफ,डि,सी,व एन,एस,के,एफ,डि,सी, महिला समृद्धी योजने अंतर्गत प्रलंबित मंजूर कर्ज वाटप करून नूतन प्रस्ताव स्वीकारा--- नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांची मागणी

बीड स्पीड न्यूज 


महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ,मार्फत राबविण्यात येणाऱ्या एन,एफ,डि,सी,व एन,एस,के,एफ,डि,सी, महिला समृद्धी योजने अंतर्गत प्रलंबित मंजूर कर्ज वाटप करून नूतन प्रस्ताव स्वीकारा--- नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांची मागणी 

बीड (प्रतिनिधी) 31 में सामाजिक न्याय विभाग सलग्न अनुसूचित जाती,जमाती, भटक्या विमुक्ता साठी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, संत रविदास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ अंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांसाठी उद्योग उभारणी करिता एन, एफ,डि,सी व एन,एस,के,एफ,डि,सी योजनेअंतर्गत कर्ज दिले जाते शासनाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून या मुळे समाजातील बेरोजगारी दूर होऊन सुशिक्षित बेरोजगारांची प्रगती होऊ शकते समाजातील सर्वच घटकांना तसेच मागासवर्गीयानां समान रेषेत आणून समता प्रस्तापीत करत सामाजिक, शैक्षणिक आर्थिक उन्नतीचे धोरण भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात समावीष्ट केले आहे. त्यांचे धोरणमुळे संबंध बहुजनांचा परिपूर्ण विकास होत आहे.परंतु गेल्या पाच वर्षापासुन मागासवर्गीयांच्या योजने बाबत केंद्र आणि राज्यातील सामाजिक न्याय विभागातील राज्यकर्त्यांची उदासीनता स्पष्ट पणे जानवत असून संबंधित योजनेअंतर्गत मंजूर असलेले कर्ज लाभर्थ्यांना वितरित केले गेले नसल्यामुळे नव उद्योजकांची आर्थिक कुचंबना होत असून सामाजिक विकास खुंटत चालला आहे. याची दखल घेऊन प्रलंबित कर्ज वितरित करून तमाम सुशिक्षित बेरोजगारांना, उद्योजकांना न्याय देऊन संबंधित योजनेअंतर्गत नूतन प्रस्ताव स्वीकारावेत अशी मागणी भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांचे सह राज्य प्रवक्ते अशोकजी कांबळे, मंगेश जोगदंड, सचिन जाधव, महादेव वंजारे, सह भिम स्वराज्य सेनेच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा