Subscribe Us

header ads

शेजारच्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेले बाप-लेक विहिरीत बुडाले

बीड स्पीड न्यूज 

शेजारच्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेले बाप-लेक विहिरीत बुडाले

परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथील दुर्घटना

परळी-: पाणी आणण्यासाठी शेजारच्या विहिरीवर गेलेले वडील पाण्यात पडले. हे पाहून मुलाने त्यांना वाचविण्यासाठी उडी मारली असता दोघेही पाण्यात बुडाले. तर, दुसऱ्या मुलाला आईने विहिरीत दोर टाकून वाचविले. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी (१३ मे). रोजी सायंकाळी साडेसहा वाजता परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथे घडली.शेख सादिक शेख हमीद (५८) व शेख रफीक शेख सादिक (२५, दोघे रा. बरकतनगर, परळी) अशी या पिता पुत्राची नावे आहेत. दादाहरी वडगाव शिवारात शेख सादिक यांची शेती असून चिकटून नातेवाईक शहादत पठाण यांची जमीन आहे. शहादत पठाण यांच्या विहिरीत पाणी आणण्यासाठी १३ मे रोजी शेख सादिक गेले होते. यावेळी पाय घसरून ते विहिरीत कोसळले. त्यांचा मुलगा शेख रफीक शेख सादिक हा त्यांना वाचविण्यासाठी सरसावला. मात्र, वडिलांना वाचविण्याच्या प्रयत्नात तोही बुडाला. दोघांना वाचविण्यासाठी शेख साजीद शेख सादिक याने विहिरीत उडी घेतली. मात्र, तोही बुडू लागला, तेव्हा प्रसंगावधान राखत आईने दोर विहिरीत टाकला व त्यास पकडून तो वर आला. दरम्यान, बुडालेले पिता पुत्र विहिरीच्या तळाशी गेले. परळी - ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारोती मुंडे व सहकाऱ्यांनी धाव घेतली. पिता-पुत्रास बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा