Subscribe Us

header ads

माळशिरस तालुका व अकलूज परिसरातील अवैध धंदे बंद करा - पै.आबा कळसाईत

बीड स्पीड न्यूज 

माळशिरस तालुका व अकलूज परिसरातील अवैध धंदे बंद करा - पै.आबा कळसाईत 


अकलूज|प्रतिनिधी-: श्री विश्वकर्मा युवक सघटनेच्या वतीने मा.प्रांत अधिकारी साहेब यांना दि.11/05/2022 रोजी निवेदन दिले आहे.  माळशिरस तालुका व अकलूज परिसरामध्ये अवैध धंद्याचा मोठा व्यापार सुरू आहे.त्यामुळे तेथील जनतेला त्याची झळ बसत आहे. व अनेक कुटुंब उद्ध्वस्त व उघड्यावर आली आहेत.  अकलूज शहरामध्ये अवैध दारू,जुगार, मटका,लाॅजवर वेश्याव्यवसाय, या धंद्याचा सुळसुळाट झाला आहे. अवैध धंदे खुलेआम सुरू असून ही पोलीस प्रशासनाचे "हाताची घडी तोंडावर बोट आहे" अवैध धंद्यावर कारवाई करण्यात यावी. हे सर्व  धंदे बंद करण्याची मागणी  ""श्री विश्वकर्मा युवक संघटना अध्यक्ष मा.पै.यशवंत (आबा) कळसाईत  यांनी प्रांत अधिकारी साहेब यांना भेटून निवेदनात देण्यात आले यावेळी उपाध्यक्ष मा.गोरख थोरात, कार्याध्यक्ष मा.अंकुश थोरात सचिव मा.शैलेश थोरात, खजिनदार मा.इब्राहिम शेख, सहसचिव मा.लाला कदम
 सदस्य, मा.वैभव लोहार, मा.कुंदन खंडागळे,मा.अंकुश धाईंजे, मा.लहु धाईंजे, मा.गोपाल अंकुश आदि उपस्थित होते. **मा.प्रांत अधिकारी यांना श्री विश्वकर्मा युवक संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनाची योग्य चौकशी करून योग्य ती कारवाई करावी  अन्यथा  ""श्री विश्वकर्मा युवक संघटनेतील""सर्व पदाधिकारी व सदस्य  यांना घेऊन  "प्रांत अधिकारी कार्यालय " समोर आंदोलन करण्यात येईल . असा ईशारा अध्यक्ष मा.पै.यशवंत(आबा) कळसाईत यांनी दिलेला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा