Subscribe Us

header ads

शाम गदळे कला व विज्ञान महाविद्यालयातील डॉ.शांता जाधवर -गिते यांना राष्ट्रस्तरीय बेस्ट टिचर अवॉर्ड.

बीड स्पीड न्यूज 


शाम गदळे कला व विज्ञान महाविद्यालयातील डॉ.शांता जाधवर -गिते यांना राष्ट्रस्तरीय बेस्ट टिचर अवॉर्ड.

बीड|प्रतिनिधी-: अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फौंडेशन तर्फे आयोजित सामाजिक कृतज्ञता समारोह  8 मे 2022 रोजी पणजी येथे संपन्न झाला.भारतातील विविध क्षेत्रात कार्य करणार्यांना पुरस्कृत करण्यात आले. गोवा राज्यातील पणजी येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात भाजपाचे गोवा विधानसभेचे आमदार राजेश फलदेसाई मुंबई येथील उद्योजक सुनील नारकर, आयुर्वेदचार्य डॉ पवार, अंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व शिल्पकार संजय हरमलकर अविष्कार फौंडेशन चे अध्यक्ष संजय पवार उपस्थित होते. डॉ शांता जाधवर - गिते यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले  बेस्ट टीचर पुरस्कारा  वेळी डॉ शांता जाधवर -गीते म्हणाल्या इथून पुढेही काम करताना मी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा व सर्वांगीण विकासाचा नेहमी प्रयत्न करत  राहील डॉ शांता जाधवर -गिते म्हणाल्या माझे पती  बालासाहेब गीते यांचे नेहमीच मार्गदर्शन आणि प्रेरणा देतात. डॉ शांता  यांना पुरस्कार मिळाल्याने परिसरातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.श्री वडमाऊली विद्याप्रसारक मंडळ चे उपाध्यक्ष श्री शरद गदळे यांनी व शाम गदळे कला व विज्ञान महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा