Subscribe Us

header ads

शासकीय कामात अडथळा केल्याचा प्रकरणात डॉ. सुदाम मुंडेला जामीन मंजूर!

बीड स्पीड न्यूज 

शासकीय कामात अडथळा केल्याचा प्रकरणात डॉ. सुदाम मुंडेला जामीन मंजूर


औरंगाबाद-: दोन वर्षापूर्वी बेकायदेशीर डॉ.सुदाम मुंडेच्या बेकायदेशीर दवाखान्यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी छापा मारला होता. यावेळी छापा मारणाऱ्या पथकाला धमकी देणे व सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याचा आरोपावरून डॉ. सुदाम मुंडेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. डॉ. सुदाम मुंडेला १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा दिली होती. त्यानंतर डॉ. सुदाम मुंडेला औरंगाबाद खंडपीठाने जामीन देतेवेळी ५ वर्षासाठी वैद्यकीय व्यवसाय न करण्याच्या अटीवर जामीन दिला होता. त्या नंतरही बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बोगस डॉक्टर शोध कमिटीने परळीतील रामनगर येथे ५ सप्टेंबर २०२०रोजी आरोपी डॉ.मुंडेच्या दवाखान्यावरती छापा टाकला होता. त्यानंतर त्या ठिकाणी ४ रुग्ण उपचार घेताना आढळले.तसेच वैद्यकीय उपकरणे व साहीत्य आढळून आले होते. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी फिर्याद दिली की, सदर छाप्यावेळी डॉ.सुदाम मुंडे यांनी सर्व पथकाला धमकी दिली व सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सुदाम मुंडेला २३ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतीय दंड विधान कलम ३५३ प्रमाणे ४ वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपये दंड कलम ३३ (२) मेडीकलव्यवसाय कायदयान्वये ३ वर्षे शिक्षा आणि कलम १५ (२) इंडीयन मेडीकल काउंसिल कायद्यान्वये एक वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. सदर निर्णयाविरोधात आरोपी डॉ.सुदाम मुंडेने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले. डॉ. सुदाम मुंडेच्या वकिलांनी युक्तीवाद केला, सदर प्रकरणात भा.दं.वि. ३५३ हे लागू होणार नाही. असा बचाव ग्राह्य धरुन उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती आर. जी. अवचट यांनी डॉ. सुदाम मुंडेचा जामीन अर्ज मंजूर केला. सदर प्रकरणात आरोपी डॉ. सुदाम मुंडे तर्फे अॅड. शशिकांत एकनाथराव शेकडे यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा