Subscribe Us

header ads

दासखेड सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी आनंदराव कोकाटे व्हाईस चेअरमन पदी अनिल कोकाटे यांची बिनविरोध निवड

बीड स्पीड न्यूज 


दासखेड सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी आनंदराव कोकाटे व्हाईस चेअरमन पदी अनिल कोकाटे यांची बिनविरोध निवड



प्रतिनिधी | बीड-: तालुक्यात  राजकीय दृष्ट्या महत्वाच्या  असलेल्या  दासखेड  येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत १३  जणांचे  अर्ज आल्याने  संचालक पदाची निवडणुक बिनविरोध झाली. सोसायटीच्या चेअरमन पदी आनंदराव कोकाटे  तर व्हाईस चेअरमन पदी अनिल कोकाटे यांचे प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.शुक्रवार १३ मे २०२२ रोजी पाटोदा तालुक्यातील   दासखेड सेवा सहकारी  सोसायटीच्या चेअरमन व  व्हाईस चेअरमन पदासाठी २  अर्ज दाखल झाले. त्यामुळे चेअरमनपदी आनंदराव पांडुरंग कोकाटे तर व्हाईस चेअरमन अनिल सिताराम कोकाटे यांची बिनविरोध निवड झाली तर  संचालक पदी भागवत पांडुरंग कोकाटे ,रामकृष्ण चौधरी ,रामराव नामदेव कोकाटे , विक्रम शिंदे , शहाजी प्रल्हाद कोकाटे , मालोजी कोकाटे ,दादाराव सर्जेराव निर्मळ , आशोक शेलार ,बबन गोरे ,आशाताई नानासाहेब वाघिरे ,सुर्वणा वसंत कोकाटे यांची निवड झाली .बिनविरोध प्रक्रिया पार पाडण्यासाठी  शिवाजीराव कोकाटे, सरपंच मधुकर कोकाटे ,  गणेश कोकाटे ,नानासाहेब वाघिरे  यांच्यासह  सह गावातील युवा व जेष्ठ नागरिकांनी सहकार्य केले . निवडणुक अधिकारी म्हणुन एस. ए . गायकवाड यांनी काम पाहिले. यावेळी  सहाय्यक निबंधक  केदार व सचिव सुनिल कोकाटे यावेळी उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा