Subscribe Us

header ads

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत प्रभाग क्र 4, मध्ये रस्ता नालीचे कामे समाविष्ट करून तात्काळ सुरु करा--- नगरसेवक अँड विकास जोगदंड

बीड स्पीड न्यूज 


लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत प्रभाग क्र 4, मध्ये रस्ता नालीचे कामे समाविष्ट करून तात्काळ सुरु करा--- नगरसेवक अँड विकास जोगदंड 

बीड (प्रतिनिधी) 22 जुन प्रभाग क्र 4 हा भाग कष्टकरी,कामगार, मागासवर्गीय बहुजन बांधवांचा असून या भागात या पूर्वी नगराध्यक्ष डॉ भारतभूषणजी क्षीरसागर, युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदे मार्फत विविध विकास कामे झालेली आहेत परंतु निधी आभावी व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुटप्पी भूमिकेमुळे अनेक  मुख्य व अंतर्गत रस्त्याची कामे रखडली आहेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेचा निधी बहुजन समाज बांधवांच्या राखीव प्रभागासाठी खर्च करून विकासात्मक कामे करावी लागतात परंतु सध्या बीड शहर व मतदार संघाची स्थिती म्हणजे बाप भीक मागू देईना आणि आई जेऊ देईना अशी झाली आहे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेचा निधी कुचकामी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केल्याने राखीव प्रभागांची वाताहत होत आहे प्रभाग क्र 4 मध्ये 
*नागोबा गल्ली येथे अजिंक्य चांदणे यांचे घरापासुन ते मातोश्री मंगल कार्यालया पर्यंत रस्ता व नाली,
*बबन रेगुडे यांचे घरापासुन ते पत्रकार देवेंद्र ढाका यांचे घर ते गुंजाळ यांचे घरापर्यंत रस्ता व नाली,
*वतार वेस पासून ते भारत कांबळे यांचे घरापर्यंत रस्ता व नाली,
*एकता नगर येथे महादेव वाघमारे यांचे घरापासुन ते राठोड यांचे घरापर्यंत रस्ता व नाली,
*आंबेडकर नगर, पुनर्वसन कॉलनी येथे लक्ष्मण तांगडे यांचे घरापासुन मुख्य पाईप लाईन पर्यंत रस्ता व नाली,
*सुंदर शिंदे यांचे घरापासुन ते सुनिल डोळस यांचे घरापर्यंत रस्ता व नाली,
*प्रमिला जाधव यांचे घरापासासून ते सर्जेराव भोले यांचे घरापर्यंत रस्ता व नाली,
*जय भिम बुद्ध विहार पासून ते सार्वजिनिक शौचालय पर्यंत रस्ता व नाली,राम हिरवे यांचे घरापासुन ते वैजनाथ डोळस यांचे घरापर्यंत रस्ता व नाली, रोकडे यांच्या घरापासून ते तोतला गिरणी पर्यंत रस्ता व नाली, दुबे कॉलनी येथे जगताप यांचे घरापासुन ते बाळू सदरे, राठोड यांच्या घरापर्यंत रस्ता व नाली आदी कामे  विकासात्मक दृष्ट्या करणे गरजेचे असून सदररील कामे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेत समाविष्ट करून कामे तात्काळ सुरु करून नागरिकांची होनारी गैरसोय टाळावीअशी मागणी भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकास जोगदंड यांचे सह अशोक कांबळे, नाना मामा कदम, मंगेश जोगदंड, राजेश कोकाटे, महादेव वंजारे, सचिन जाधव,अक्षय कोरडे, गोरख जोगदंड आदींनी जिल्हाधिकारी, नगर परिषदेचे प्रशासक, व मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक