Subscribe Us

header ads

शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीवरुन खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू

बीड स्पीड न्यूज 

शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीवरुन खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू 

बीड|प्रतिनिधी-: येथील शासकीय विश्रामगृहाच्या जुन्या इमारतीवर एसी मशीन बसवण्याचे काम करतांना एका कामगाराचा इमारतीवरुन अंदाजे 40 फूट खाली पडल्याने गंभीर जखमी होवून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना 21 जून रोजी सायंकाळी 6.15 वाजेच्या सुमारास घडली. पोलीसांच्या माहितीनुसार, आसिफ सत्तार खान (26, रा. तेलगाव नाका बीड) असे मयताचे नाव आहे. शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीवर एसी मशीन बसवण्याचे काम सुरु होते. या दरम्यान आसीफ खान हे इमारतीवरुन खाली पडले. दरम्यान तिथे असलेल्या नागरिकांनी तातडीने उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्यासह अन्य डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरु केले. मात्र उपचारा दरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने तेलगाव नाका परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. माहिती मिळाल्यानंतर अनेकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक