बीड स्पीड न्यूज
पत्रकार आयेशा शेख यांची महिला दक्षता अध्यक्ष पदी निवड
बीड प्रतिनिधी / दि.22 बीड शहरातील समाजसेविका तथा पत्रकार आयेशा रफीक शेख यांची महिला दक्षता समितीच्या शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्यांनी किन्नर सपना बाळू यांचा विवाह यशस्वीपणे लावून दिला त्यानंतर त्यांनी अनेक जणांचे संसार वाचवला.भाडण तंटे यशस्वीपणे हाताळले, अनाथ, वंचित, उपेक्षित व किन्नर मुला- मुंली साठी शिक्षणाची दारे उघडून अनेकांना प्रवेश देखील मिळवून दिले. अनाथ मुले दत्तक व शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली या कामात स्वतःला झोकून दिल्यामुळे त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. व त्यांच्या कुटुंबाने त्याची साथ दिल्यामुळे त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. त्याची दखल घेत त्यांची शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या महिला दक्षता पथकाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या महिला दक्षता अध्यक्षपदी पत्रकार शेख आयेशा यांची निवड झाल्याने महिलांच्या अन्याय अत्याचाराची प्रश्न महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे फायदा होईल. आता या माध्यमातून देखील समाज सेवेचे काम चालू राहणार आहे. त्यामध्ये त्यांच्या कार्याचे योगदान महत्त्वाचे असल्यामुळे त्याची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक केतन राठोड, पोलिस उपनिरीक्षक मीना तुपे यांनी दिली आहे. या निवडीबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या