Subscribe Us

header ads

मिल्लीया महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

बीड स्पीड न्यूज 



मिल्लीया  महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

बीड|प्रतिनिधी-: येथील मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,  औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रश्नमंजुषा, विविध विषयावर व्याख्यानमाला आणि योग प्रशिक्षण या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. क्रीडा विभाग प्रमुख तथा उपप्राचार्य डॉ. सय्यद हनिफ  यांनी दैनंदिन जीवनामध्ये योगाचे महत्व सांगून  प्राणायाम, अनुलोम-विलोम व इतर योगा प्रकार यांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. योगाचे विविध प्रकार योगासने व योगा करण्याच्या शास्त्रीय पद्धती यावर सखोल माहिती दिली. दिनांक २१ जून २०२२ मंगळवार रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ, उपप्राचार्य हुसैनी एस एस., राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विष्णू सोनवणे,  प्राध्यापिका डॉ. संध्या बीडकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.विष्णू सोनवणे यांनी केले. त्यांनी यानिमित्त आयोजित केलेल्या विविध उपक्रमाबद्दल सांगितले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापकवृंद, कर्मचारीवृंद यांची उपस्थिती होती. कार्यक्रमचे सूत्रसंचालन डॉ. विष्णू सोनवणे यांनी तर आभार डॉ. संध्या बीडकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक