Subscribe Us

header ads

माजलगावात डोळ्यात मिरची टाकून शेतकऱ्याचे साडेतीन लाख रुपये लुटले

बीड स्पीड न्यूज 


माजलगावात डोळ्यात मिरची टाकून शेतकऱ्याचे साडेतीन लाख रुपये लुटले


माजलगाव|प्रतिनिधी-:  तालुक्यातील लोणगाव येथील दोन शेतकरी येथील एका बँकेतून पैसे घेऊन जात असताना चोरट्यांनी कॅनल जवळ मोटर सायकल अडवुन व त्यांच्या डोळ्यात मिरची टाकत मारहाण केली.त्यांच्याजवळील साडेतीन लाख रुपये लुटण्यात आले.उसाचे बिल आल्याने लोणगाव येथील जनार्धन कोळसे व गजानन कोळसे हे दोन बंधू पूर्णवादी बँकेतुन सव्वातीन लाख रुपये काढून गावाकडे मोटारसायकलवर (एम.एच.2 ए.एस.0028 ) जात असताना माजलगाव - पात्रुड रस्त्यावरील कॅनल जवळ तिघेजण मोटरसायकलवरून येत या दोन बंधूंच्या मोटरसायकलला मोटार सायकल आडवी लावली.त्यांच्या डोळ्यात मिरची टाकली व यांनी थैली देण्यास प्रतिकार करताच त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली. यात त्यांच्या हातातील थैली खाली पडली त्यानंतर अज्ञात तीन चोरटे पैसे घेऊन पसार झाले. ही बाब ग्रामीण पोलीसांना कळवताच पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा