Subscribe Us

header ads

दहावीचा निकाल उद्यादुपारी एक वाजता जाहीर होणार; शिक्षणमंत्री वर्षागायकवाड

बीड स्पीड न्यूज 

दहावीचा निकाल उद्यादुपारी एक वाजता जाहीर होणार; शिक्षणमंत्री वर्षागायकवाड

मुंबई-: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच 17 जून, 2022 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिल मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवार दि 17 जून रोजी दुपारी 1 वाजता राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे राज्य मंडळाच्या वतीने दिलेल्या पत्रात म्हटले आहे तर निकाला संदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी समाजमाध्यमावरून माहिती दिली आहे. या परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातून 1 लाख 79 हजार 486 तर राज्यातून एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून 21 हजार 284 ठिकाणी परीक्षा पार पडली होती.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा