Subscribe Us

header ads

सरकार बरखास्त करुन मध्यावधी निवडणूका लावून जनतेच्या पैशाची उधळन करू नये---- प्रा. इलियास इनामदार

बीड स्पीड न्यूज 


सरकार बरखास्त करुन मध्यावधी निवडणूका लावून जनतेच्या पैशाची उधळन करू नये---- प्रा. इलियास इनामदार


बीड प्रतिनिधि: सरकार बरखास्त करुन मध्यावधी निवडणूका लावून जनतेच्या पैशाची उधळन करण्याचा काही सत्तेचे भूकेले व बदमाश नेत्यांचा डाव दिसतो पण राज्यपालांनी त्यांचे डाव हानून पाड़ावे अशी मागणी लोकसेना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी राज्यपाल यांना ईमेलद्वारे करणार आहे काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये राजकीय घोड़ेबाजारी सुरु झालेली दिसत आहे शिवसेनेच्या काही बंडखोर आमदरांनी महाविकास आघाडी सरकार मधून सैराट सारखे पळ काढ़ल्यापासून असे वाटते की महाराष्ट्र सरकार कोसळेल की काय पण आतापर्यंत बघितले तर महाविकास आघाडीचा कामकाज श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कार्यकाल मध्ये चांगल्यापैकी सुरु आहे सोबत कांग्रेस-राष्ट्रवादीची साथ पण बऱ्यापैकी होती व आहे कोरोना सारख्या महाभयंकर महामारीमध्ये उद्धव सरकारने राज्याला ज्या पद्धतीने सावरण्याचा प्रयत्न केला ते त्यांच्या योग्यतेचे बक्षीस होते राज्याला कोणत्याही जीवनावश्यक वस्तुचा तुटवडा भासु दिला नाही अनेक संकटांना समोरें जावून उद्धव सरकारने सामना केलेला महाराष्ट्राने नव्हे तर अख्या भारताने बघितले याच वेळी जगाने उत्तर प्रदेश मध्ये योगी आदित्यनाथ यांच्या काळात शव व प्रेतांना गंगेत कुत्रे जनावरे लचके तोड़ताना बघितले हे पण आपण कधी विसरु नये, जे शहाणे बंडखोरी करुन फरार झाले त्यांचे हिंदुत्व हे प्रेम पैसा सत्तेचा मोह व ईडीची भिती असू शकते कारण महाराष्ट्राचे आमदार बंडखोरी करतात व त्यांना फरार होण्यासाठी सुरत मार्गे गुजरात व आसाम पोलिस संरक्षण देते कसे व यांना पोलिस संरक्षण मिळवुन देणारे कोण? हे पण समोर यायला हवे. राजधर्म काय असते ते जगाने श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या रूपाने बघितलेले आहे अशा बहुगुणी नेत्याशी बंडखोरी करणे म्हणजे अराजकीय नीचता म्हणावी लागेल अशी प्रतिक्रिया लोकसेना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी प्रसार माध्यमांशी केली आहे.

                             
                        
                     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा