Subscribe Us

header ads

'त्या' आठ जणांचा बळी घेणाऱ्या इनोव्हा चालकावर गुन्हा दाखल

बीड स्पीड न्यूज 


'त्या' आठ जणांचा बळी घेणाऱ्या इनोव्हा चालकावर गुन्हा दाखल


केज प्रतिनिधी-: केज तालुक्यातील होळ येथे भरधाव इनोव्हा कारने अॅपे रिक्षाला दिलेल्या धडकेत आठ जणांचा बळी गेला होता. निष्काळजीपणे वाहन चालवून अपघाताला आणि आठ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या प्रकरणी इनोव्हा चालकावर युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या भीषण अपघातातील एक जखमी अभिजीतसिंग बादलसिंग टाक (वय १९, रा. जालना) या युवाच्या फिर्यादीनुसार, केज येथील त्याच्या बहिणीच्या सासऱ्याच्या अंत्यविधीचा धार्मिक कार्यक्रम आटोपून गुरुवारी (दि.०२) परळी येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी अॅपे रिक्षातून (एमएच २३ एक्स ५२२९) निघाले होते. वाटेत होळ येथे समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या इनोव्हा कारच्या (एमएच १६ सीएन ७००) चालकाने त्याची कार निष्काळजीपणे चालवून त्यांच्या ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अॅपेरिक्षा चालक आणि टाक यांचे सात नातेवाईक असा एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. तर अभिजीतसिंग टाक, आल्लासिंग दुर्गासिंग कालानी, कुलदीपसिंग गोके आणि इनोव्हातील प्रवाशी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. या अपघातास आणि आठ जणांच्या मृत्यूस इनोव्हाचा चालक कारणीभूत आहे. सदर फिर्यादीवरून इनोव्हा चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास युसुफ वडगाव पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा