Subscribe Us

header ads

वाढत्या महागाईचा विचार करून रमाई घरकुल आवास योजना व प्रधान मंत्री घरकुल आवास योजनेच्या अनुदानात सात लाख रु एवढी वाढ करा --- नगरसेवक अँड विकासजी जोगदंड

बीड स्पीड न्यूज 


वाढत्या महागाईचा विचार करून रमाई घरकुल आवास योजना व प्रधान मंत्री घरकुल आवास योजनेच्या अनुदानात सात लाख रु एवढी वाढ करा --- नगरसेवक अँड विकासजी जोगदंड

बीड (प्रतिनिधी) 2 जुन सर्वसामान्यांचे स्वतः चे हक्काचे पक्के घर उभारण्यासाठी शासन अनुसूचित जाती, साठी रमाई घरकुल आवास योजना राबवित असून इतरांसाठी प्रधान मंत्री घरकुल आवास योजना कार्यान्वित आहे. सदरच्या योजना अतिशय महत्वाकांक्षी असून गौरवशाली आहेत.शहरी भागासाठी नगर परिषद तर ग्रामीण साठी जिल्हा परिषद,पंचायत समिती मार्फत सामाजिक न्याय विभागा अंतर्गत पारदर्शकपणे राबविण्यात येते,सदरील योजनेचे अनुदान सध्या प्रति घरकुल अडीच लाख रु फक्त देण्यात येते आज च्या परिस्थितीचा जर का विचार केला तर महागाईने सर्वांधिक उच्चांक गाठला आहे. बांधकाम साहित्याचे भाव गगनाला भिडले आहेत.त्यात हे अनुदान भक्कम पाया भरणी साठी चं खर्च करण्यात येते लाभार्थी स्व खर्च करून बांधकाम पूर्ण करतात अनेक लाभार्थी उसने अथवा खाजगी सावकाराचे कर्ज काढतात आणि नंतर मग आर्थिक विवेचनात सापडतात असे ही काही ठिकाणी निदर्शनास येत आहे.सदरील योजना अंतर्गत सध्याचा निधी बांधकामा साठी अपुरा पडत असल्याने त्यात वाढ करून सात लाख रु अनुदान देण्यात यावे.
अशी मागणी भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी जिल्हाधिकारी  यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचेकडे निवेदना द्वारे केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा