Subscribe Us

header ads

तहसील कार्यालय, बीड येथे नियंत्रण कक्ष स्थापन

बीड स्पीड न्यूज 



तहसील कार्यालय, बीड येथे नियंत्रण कक्ष स्थापन

 

बीड, प्रतिनिधी-: दि. 02  नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत तहसील कार्यालय, बीड येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याचा दूरध्वनी क्रमांक 02442-222902 असा आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण बीड यांचे आदेशानुसार हा नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. तरी बीड तालुक्यातील नागरिकांनी आवश्यकता भासल्यास आपत्कालिन परिस्थितीमध्ये नियंत्रण कक्षातील दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार तथा अध्यक्ष, बीड तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बीड यांनी केले आहे.माहे जून महिन्यात मोसमी पावसाला सुरुवात होऊन, अनेकदा वादळे, अतिवृष्टी, पूर, वीज पडणे, दरडी कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. ही बाब लक्षात घेवून आपत्तीत होणारी जीवित व वित्त हानी याची माहिती वेळेवर उपलब्ध करुन देण्यासाठी, निर्माण झालेली परिस्थिती, घडलेल्या घटना तात्काळ संकलित करण्यासाठी हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा