Subscribe Us

header ads

रंजेगाव येथे एका विवाहित महिलेला विवस्त्र करून गळा आवळून खून!

बीड स्पीड न्यूज 

रंजेगाव येथे एका विवाहित महिलेला विवस्त्र करून गळा आवळून खून!

पिंपळनेर प्रतिनिधी-: तालुक्यातील रंजेगाव येथे एका विवाहित महिलेला विवस्त्र करून गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना ५ जून रोजी पहाटे दोन वाजता घडली आहे. दरम्यान, चोराने आपल्याला बांधून ठेवले असा दावा करणाऱ्या पतीवरच संशय असून त्याची पोलिस कसून चौकशी करीत आहे. या धक्कादायक पोलिसांच्या माहितीनुसार, ज्योती दिनेश आबुज (२९) असे मयत महिलेचे नाव आहे. ज्योतीचे माहेर (सिंदफणा चिंचोली ता. गेवराई) असून १२ वर्षांपूर्वी तिचा विवाह दिनेश उर्फ विश्वांभर पांडुरंग आबुज (३५, रा. रंजेगाव) याच्याशी झाला होता. दिनेश शेती करतो तर ज्योती घरकाम करते. दिनेशचे आई- वडील चार धाम यात्रेसाठी गेले होते. घरी ज्योती, दिनेश व त्यांची दोन मुले होती.५ जून रोजी पहाटे दोरीने गळा आवळून ज्योतीचा खून करण्यात आला. पहाटे पतीने चार ते पाच चोरांनी घरात घुसून मारहाण करत पत्नीला विवस्त्र केले तर आपल्याल बाहेर दरवाजाजवळ बांधून टाकून नंतर पत्नीला संपविले असा खुलासा पतीने केला आहे . दरम्यान, घटनास्थळी उपअधीक्षक संतोष वाळके ,पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव, उपनिरीक्षक उपनिरीक्षक एम. एन. ढाकणे तसेच गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविला. खुनाचे गूढ कायम असून तपास यंत्रणा जोमाने कामाला लागल्या आहेत. महिलेचा गळा आवळून खून झाला हे स्पष्ट आहे. संशयित पतीची चौकशी केली जात आहे. सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. लवकरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईल, अशी माहिती उपअधीक्षक संतोष वाळके यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा