Subscribe Us

header ads

आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवाव्यात- जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा बिंदुसरा धरणात आपत्ती व्यवस्थापनची रंगीत तालीम


बीड स्पीड न्यूज 

आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवाव्यात- जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा


बिंदुसरा धरणात आपत्ती व्यवस्थापनची रंगीत तालीम


बीड| प्रतिनिधी-: दि. 9, (जि. मा. का.) : आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आज येथे दिल्या.आपत्ती 

व्यवस्थापन कायद्याअंतर्गत बिंदुसरा धरण, पाली येथे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या उपस्थितीत अग्निशमन दलाकडून रंगीत तालीम घेण्यात आली. त्यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यंत्रणा 

सज्ज असल्याबाबतची तसेच सरावची पाहणी केली. अग्निशमन दलाचे प्रशिक्षित कर्मचारी यांना सूचना दिल्या.यावेळी बीडचे तहसीलदार सुहास हजारे, नगरपरिषद मुख्याधिकारी उमेश ढाकणे, जिल्हा आपत्ती 

व्यवस्थापन अधिकारी राजदीप बनसोड, नगरपरिषद मुख्य अग्निशमन अधिकारी भागवत धायतडक, पालीचे सरपंच दशरथ राऊत, तलाठी एस. बी. बांगर, ग्रामसेवक भाऊसाहेब मिसाळ, अग्निशमन दलाची टीम उपस्थित 

होती.यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी नगरपरिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन सुसज्जततेचा आढावा घेतला. अग्निशमन दलाकडे 2 बोटी, 10 लाईफ जॅकेटस, 6 लाईफ बॉय रिंग्स, गळ, दोरी आदि साहित्य 

असल्याची माहिती भागवत धायतडक यांनी दिली.बिंदुसरा धरणावर येणारे पावसाचे पाणी वाढल्यास सामान्य नागरिकांना त्या ठिकाणी जाण्यास मनाई करण्याच्या सूचना सरपंच व तलाठी पाली यांना यावेळी 

देण्यात आल्या. सुरक्षा कठडे तयार करण्यास आणि कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी दक्ष राहण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले.यावेळी बीड नगरपरिषद अग्निशमन विभागाचे व्ही. एम. कानतोडे, एस. डी. बहिर जी. व्ही. ढोकणे, ए. ए. कपाळे आदि कर्मचाऱ्यांनी प्रात्यक्षिक सादर केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा