Subscribe Us

header ads

दोन मुलांना झोपेत सर्पदंश, एकाचा मृत्यू, दुसऱ्याची मृत्यूशी झुंज

बीड स्पीड न्यूज 

दोन मुलांना झोपेत सर्पदंश, एकाचा मृत्यू, दुसऱ्याची मृत्यूशी झुंज


वडवणी - रात्रीच्या वेळी घरात झोपलेल्या दोन बालकांना विषारी सापाने चावा घेतला. यात एका बालकाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला टर दुसऱ्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. ही घटना वडवणी शहरात घडली.वडवणी शहरातील कैकाडी गल्ली येथील सागर ऊर्फ आदर्श बाळू गायकवाड (वय साडेचार वर्षे) आणि आर्यन गायकवाड (वय 6 वर्षे) या दोन बालकांना मध्यरात्रीच्या दरम्यान साप चावला. पोटात दुखतय म्हणून मुलाने आईकडे तक्रार केली असता आईला अंथरुणामध्ये साप निदर्शनास आला. या वेळी सापाला मारण्यात आले, दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र सागर ऊर्फ आदर्श बाळू गायकवाड या साडेचार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून आर्यन गायकवाड याच्यावर धारूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने वडवणी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा