Subscribe Us

header ads

प्रशासकीय बदली रद्द करण्यासाठी सी.ओ वर राजकीय दबाव

बीड स्पीड न्यूज 

प्रशासकीय बदली रद्द करण्यासाठी सी.ओ वर राजकीय दबाव




बीड प्रतिनिधी-:जिल्हा परिषद बीड येथे दि. १३/०५/२०२२ रोजी समुपदेशनाने जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या अनेक वर्षापासून एकाच तालूक्यात ठाण मांडून बसलेल्या जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या नियमाप्रमाणे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी प्रशासकीय बदल्या केल्या आहेत. परंतू गेवराई येथील एका जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यांची प्रशासकीय बदली माजलगाव तालूक्यात झाली असतांना सुध्दा तो त्या तालुक्यात जाण्यासाठी तयार नाही. बदली रद्द करण्यासाठी त्यांनी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्यावर मोठया प्रमाणात राजकीय दबाव आणला आहे. एका प्रामाणिकपणे काम करणा-या अधिका-यावर राजकीय दबाव आणून काम करु दिले जात नाही. सदरील प्रशासकीय बदली अनाधिकृतपणे रद्द केल्यास बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ कोर्टात याचिका दाखल करुन आंदोलन करणार आहे असा इशारा देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा