Subscribe Us

header ads

अवघड घाटांच्या रस्त्यावरुन दोनशे किलोमीटर सायकलिंग बीडच्या सुदर्शन हेरकर यांचा विक्रम; तेरा तासात पार केले अंतर

बीड स्पीड न्यूज 


अवघड घाटांच्या रस्त्यावरुन दोनशे किलोमीटर सायकलिंग बीडच्या सुदर्शन हेरकर यांचा विक्रम; तेरा तासात पार केले अंतर

बीड ः प्रतिनिधी-: येथील कर सल्लागार सुदर्शन हेरकर यांनी पुणे येथे दि.5 जून रोजी आयोजीत केलेल्या बीआरएम रॅडीनीओरिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता. पुणे ते पाचगणी व परत पुणे असे दोनशे किलोमीटरचे अंतर त्यांनी 13 तास 8 मिनीटात पूर्ण केले. या प्रवासारम्यान कात्रज, खंबाटकी व पसरणी असे तीन अवघड घाटही आहेत. औरंगाबाद विभागातून सहभागी झालेले ते एकमेव स्पर्धक होते.बीड येथील कर सल्लागार सुदर्शन हेरकर हे सायकलिंग व मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेतात. फ्र ान्समधील अ‍ॅडॉक्स क्‍लबच्या वतीने बीआरएम (ठरलेल्या वेळेत 200 किमी अंतर पार करणे) स्पर्धा पुणे येथे आयोजीत करण्यात आली होती. दि.5 जून रोजी पुणे विद्यापीठापासून  

स्पर्धेला सुरुवात झाली. पुणे ते पाचगणी व परत पुणे असे 204 किलोमीटरचे अंतर सुदर्शन हेरकर यांनी 13 तास 8 मिनीटात पूर्ण केले. औरंगाबाद विभागातून या स्पर्धेत सहभागी होणारे ते एकमेव स्पर्धक होेते. या प्रवासादरम्यान कात्रज, खंबाटकी व पसरणी असे तीन घाट असून हे अवघड घाट पूर्ण करत त्यांनी स्पर्धा नियोजीत वेळेआधी पूर्ण केली.सुदर्शन हेरकर हे 2019 पासून सायकलिंग करतात. यासाठी योगा ग्रुपचे डॉ.अनिल थोरात, लक्ष्मीकांत महाजन व माने यांच्यासह सर्व सदस्य तसेच वडील सेवानिवृत्त प्राचार्य मन्मथअप्पा हेरकर, पत्नी अरुणा व कुटूंबीयांची साथ व मार्गदर्शन मिळाल्याचे हेरकर यांनी म्हटले. हेरकर यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

देशातील प्रतिष्ठीत स्पर्धा

पुणे-पाचगणी-पुणे दरम्यान आयोजीत करण्यात येणारी ही देशातील प्रतिष्ठीत आणि खडतर स्पर्धा आहे. कठीण घाट, प्रचंड रहदारी आणि विरुद्ध दिशेने असणरे वारे अशा परिस्थितीत दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर सुदर्शन हेरकर यांनी हे 204 किलोमीटरचे अंतर पार केले.
-




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा