Subscribe Us

header ads

केजमध्ये साई एंटरप्रायजेसच्या नावाने लक्की ड्रॉ चालवणाऱ्या चौघांवर गुन्हादाखल

बीड स्पीड न्यूज 


केजमध्ये साई एंटरप्रायजेसच्या नावाने लक्की ड्रॉ चालवणाऱ्या चौघांवर गुन्हादाखल

केज - स्वतःच्या फायद्यासाठी शिवजयंती निमित्त लक्की ड्रॉचे आयोजन करुन चार चाकी वाहनासह इतर बक्षीसांचे अमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी साई एंटरप्रायजेसच्या चार ठगा विरुद्ध सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशा नुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.केज येथे साई एंटरप्रायजेस नावाखाली शिवजयंती निमित्त अमोल गालफाडे, शिवराज मुथळे, राहुल शेवाळे व राहुल औसेकर या चौघांनी त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना आमिष दाखवून 1 हजार 500 रु. प्रमाणे तिकीटे / कार्ड छापून त्याची विक्री केली. त्यातून भाग्यवान विजेत्याना स्कॉर्पिओ, स्विफ्ट, बुलेट मोटार सायकल, टीव्ही, फ्रिज आणि इतर बक्षिसे दिली जाण्याचे आमिष दाखविले. तसेच त्यांनी 19 फेब्रुवारी रोजी सोडत काढण्याचे घोषीत करुन त्यात पुन्हा बदल केला. काढलेल्या सोडतीचे व्हिडीओ चित्रीकरण केले आणि ते एका यु-ट्यूब वर प्रसारीत करून लागलीच हटविले. या प्रकरणी केज येथील पत्रकार साजेद इनामदार यांना त्यांची स्वतःची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच; त्यांनी थेट ही बाब सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना भेटून सर्व हकीकत कथन केली. त्या नंतर पंकज कुमावत आणि शंकर वाघमोडे यांच्या आदेशा वरुन पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी प्राथमिक चौकशी करुन प्रकरणाची शहानिशा केली. त्यांनी सर्व माहिती वरिष्ठांना सादर केल्या नंतर त्यांच्या आदेशाने दि. 10 जून शुक्रवार रोजी केज पोलीस ठाण्यात अमोल गालफाडे, शिवराज मुथळे, राहुल शेवाळे आणि राहुल औसेकर या चौघांच्या विरुद्ध पत्रकार साजेद इनामदार यांच्या तक्रारी वरून ठाणे अंमलदार रुक्मिण पाचपिंडे यांनी गु. र. नं. 233/2022 भा. दं. वि. 420 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा