Subscribe Us

header ads

मिल्लीया महाविद्यालयातर्फे पर्यावरण व स्वच्छता जनजागृती

बीड स्पीड न्यूज 


मिल्लीया महाविद्यालयातर्फे पर्यावरण व स्वच्छता जनजागृती

बीड|प्रतिनिधी-:  येथील मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  करण्यात आलेल्या "पर्यावरण व स्वच्छता जनजागृती  सप्ताह " निमित दि. 08 जून रोजी महाविद्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला, दि.09 जून रोजी महाविद्यालयाने दत्तक घेतलेले गाव फुलसांगवी या ठिकाणी पाऊस सुरू होण्यापूर्वी तलाव परिसर स्वच्छ करण्यात आला व दि. 10 जून रोजी फुलसांगवी येथील मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला.  राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी व फुलसांगवी येथील ग्रामस्थ यांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विष्णू सोनवणे,  प्राध्यापिका डॉ. संध्या बिडकर यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.विष्णू सोनवणे यांनी  विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या मध्ये स्वच्छता आणि पर्यावरण याविषयी जनजागृती निर्माण व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे  सांगितले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापकवृंद, कर्मचारीवृंद, फुलसांगवीचे ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमचे सूत्रसंचालन डॉ. विष्णू सोनवणे यांनी तर आभार डॉ. संध्या बीडकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ, उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस.एस. यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा