Subscribe Us

header ads

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री ;सायंकाळी साडेसात वाजता मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार

बीड स्पीड न्यूज 

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री ;सायंकाळी साडेसात वाजता मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार


मुंबई-:एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील, अशी धक्कादायक घोषणा गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते राजभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. फडणवीस आणि शिंदे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राज्याच्या राजकारणाने एक वेगळेच वळण घेतले. या घोषणेनंतर फडणवीसांनी मोठेपणा दाखवला, बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपद दिले, अशी भावुक प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केले. गेल्या दहा दिवसांपासून हा सत्तासंघर्ष सुरू होता. शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी राजीनामा दिला. त्यानंतर आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येती होती. मात्र, फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. त्यानुसार शिंदे हे आज सायंकाळी साडेसात वाजता मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा