Subscribe Us

header ads

संभाजीनगर नामांतराला विरोध; औरंगाबादेत कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

बीड स्पीड न्यूज 


संभाजीनगर नामांतराला विरोध; औरंगाबादेत कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामे 

औरंगाबाद-: महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केले.यास विरोध करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरु झाले आहे. औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी, मराठवाडा अल्प संख्यांक विभागाचे अध्यक्ष हमद चाऊस यांच्यासह अनेकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहे आहेत.शिवसेनेतील बंडाळीनंतर महाविकास आघाडी सरकार ने बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक घेत निर्णयांचा धडाका लावला. औरंगाबादचे 'संभाजीनगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशीव' अशा नामांतरास मान्यता देण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाकडून आलेल्या नामांतराच्या प्रस्तावांना मान्यता दिल्यानंतर आता ते केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहेत. मात्र, या नामकरणास स्थानिक काँग्रेसमधून विरोध होऊ लागला आहे. औरंगाबादमधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाविरोधात राजीनामा सत्र सुरु केले आहे. आजवर काँग्रेसचा संभाजीनगर नामांतर करण्यास विरोध होता. परंतु, महाविकास आघाडीच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत आलेल्या संभाजीनगर नामांतर प्रस्तावास काँग्रेसच्या मंत्र्यांनी विरोध दर्शवला नाही. नामांतराचा निर्णय होताच स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यास विरोधात दर्शवत आपले राजीनामे सादर केले आहेत.आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत याचे पडसाद उमटणार आहेत. यामुळे काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

या पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे 

- मोहम्मद हिशाम उस्मानी, अध्यक्ष- औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस - हमद चाऊस, मराठवाड़ा अध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग,- मझर पटेल, जिल्हा अध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग - -शेख अथर, शहर जिल्हा अध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग- सय्यद हमीद, शाहगंज ब्लॉक अध्यक्ष • आमेर अब्दुल सलीम, प्रदेश महासचिव युवक काँग्रेस- इद्रीस नवाब खान, प्रदेश सचिव युवक काँग्रेस, - मुजफ्फरखान पठाण, सचिव, औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस, - अखिल पटेल, मा. प्रदेश महासचिव युवक काँग्रेस व सदस्य औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस,- मसरूर सोहेल खान, मा. प्रदेश सचिव युवक काँग्रेस व सदस्य - औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस - मोईन ईनामदार, मा. प्रदेश सचिव युवक काँग्रेस व सदस्य औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस - हाजी मोईन क़ुरैशी, शहर जिल्हा कार्याध्यक्ष, अल्पसख्यांक विभाग, - इरफ़ान गुलाब खान, शहर जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस, - लियाक़त पठाण, मा. अध्यक्ष औरंगाबाद पूर्व विधान युवक काँग्रेस- व सदस्य, औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस - शेख शफीक सरकार, महासचिव, शहर जिल्हा युवक काँग्रेस - शोएब अब्दुल्ला शेख, महासचिव, शहर जिल्हा युवक काँग्रेस - इंजीनियर मोहसीन खान, महासचिव, शहर जिल्हा युवक काँग्रेस - - अनीस पटेल, प्रदेश महासचिव, किसान खेत मज़दूर काँग्रेस - शेख सगीर अहेमद, विधान सभा सचिव, युवक काँग्रेस - शेख फैज़, विधान सभा अध्यक्ष, युवा काँग्रेस

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा