Subscribe Us

header ads

नॅशनल उर्दू माध्यमिक विद्यालयाचा दहावी परीक्षेत ९८.८६% निकाल

बीड स्पीड न्यूज 



नॅशनल उर्दू माध्यमिक विद्यालयाचा दहावी परीक्षेत ९८.८६% निकाल


बीड (प्रतिनिधी) - शहरातील जुना बाजार भागात असलेल्या नॅशनल उर्दू माध्यमिक शाळेत इयत्ता दहावीचा निकाल ९८.८६% असा घवघवीत लागला आहे. दिनांक १७ जून २०२२ ला जाहीर करण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत नॅशनल उर्दू माध्यमिक विद्यालयाचे ८८ विद्यार्थी बसले होते आणि एक विद्यार्थी गैरहजर होता. ८८ पैकी ८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी २८ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले. ५४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर ५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी शेख सिमरन दिलावर या विद्यार्थिनीने ८६.२०% गुण घेत प्रथम क्रमांक मिळविला. सय्यद सबा सय्यद खैसर या विद्यार्थिनीने ८४.२१% गुण, अलफिया बेगम शेख चाँद हिने ८४.००% गुण घेत तृतीय क्रमांक मिळविला. या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार बीड ॲड. सिराजोद्दीन देशमुख,  सचिव सुभाष चंद्रजी सारडा प्रियदर्शनी एज्युकेशन ट्रस्ट, बीड. आणि मुख्याध्यापक सिद्दिकी नवीद यांनी अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा