Subscribe Us

header ads

सरस्वती विद्यामंदिर शाळेत आरोग्य विषयक कार्यशाळा

बीड स्पीड न्यूज 


सरस्वती विद्यामंदिर शाळेत आरोग्य विषयक कार्यशाळा


बीड / प्रतिनिधी-: शहरातील सरस्वती विद्या मंदिर व महाराष्ट्र शासनाचे आरोग्य खाते यांच्या संयुक्त विद्यमाने अमली पदार्थ सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्यविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले . सरस्वती विद्या मंदिर शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत  जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉ . अशोक मते , डॉ . अंबादास जाधव यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले . विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ . अशोक मते म्हणाले की , पौगंडावस्थेतील विद्यार्थी जास्त तणावात असतात . विद्यार्थ्यांच्या मनावर अभ्यासाबरोबरच इतर गोष्टींचाही तणाव असतो . या वयात शारीरिक बदल घडून येत असतो . अशावेळी मुलांनी आपल्या आईवडिलांचा सल्ला घेणे आवश्यक असते . आरोग्यविषयक कोणतीही समस्या असेल तर 104 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही सल्ला घेऊ शकता . पुढे बोलताना डॉ . मते म्हणाल की , मोबाईलमुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढत चालला आहे . मोबाईलवर गेम खेळल्याने व विविध चित्रफिती पाहण्यामुळे मनावर ताबा राहात नाही . अनेक विद्यार्थी एकलकोंडे होत चालले आहेत . तंबाखू , शिगारेट यासारखे कोणतेही व्यसन शरीरासाठी अपायकारक असते . तोंडाच्या कर्करोगांपैकी ९० % कर्करोग तंबाखूमुळे होतो . असेही डॉ . मते म्हणाले . याप्रसंगी डॉ . अंबादास जाधव यांनी विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले . अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे एक स्कूल बॅग देण्यात आली . शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यशाळेस प्रशांत पवार , डॉ . नंदकुमार उघाडे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा