Subscribe Us

header ads

दारू पिऊन बाप-लेकाने केले भांडण; लेकाच्या मारहाणीत अतिरक्तस्त्राव झाल्याने बापाचा मृत्यू

बीड स्पीड न्यूज 

दारू पिऊन बाप-लेकाने केले भांडण; लेकाच्या मारहाणीत अतिरक्तस्त्राव झाल्याने बापाचा मृत्यू


केज|प्रतिनिधी-: केज दारुड्या पिता-पुत्राचा आपसात वाद झाला. यावेळी मुलाने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पित्याचा अतिरक्तस्त्राव होऊन मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यातील युसुफ वडगाव येथे सोमवारी (दि. १३) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी दारुड्या मुलाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंदवला.निवृत्ती कोंडीबा लगसकर (वय ६५, रा. युसुफ वडगाव) असे त्या मृत पित्याचे नाव आहे. त्यांचा दुसरा मुलगा पोपट (ह.मु. घाटनांदूर) यांच्या फिर्यादीनुसार, वडील निवृत्ती आणि भाऊ मल्हारी हे दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले होते. त्यांच्या व्यसनाला कंटाळून पोपट यांची आई आणि भावजय मागील अनेक वर्षापासून उदगीरला स्थायिक झाल्या आहेत. निवृत्ती आणि मल्हारी या पिता-पुत्रात नेहमी वाद होत असे. रविवारी (दि. १२) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारासही दारू पिऊन त्यांनी आपसात वाद घातला. यावेळी मद्यधुंद मल्हारीने वडील नेहमी दारू पितात म्हणून त्यांच्या पायावर कोणत्यातरी वस्तूने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले आणि निघून गेला. त्यानंतर जखमी झालेले निवृत्ती रात्रभर घरातच पडून होते. घरात इतर कोणीही नसल्याने त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. अखेर जखमेतून अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी निवृत्ती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे पाहून पोपट यांच्या मित्राने त्यांना कळवले. पोपट लगसकर यांच्या फिर्यादीवरून मल्हारी लगसकर याच्यावर युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी मल्हारी यास राहत्या घरातून अटक केली. यावेळीही तो मद्यधुंद अवस्थेतच होता अशी माहिती सूत्रांनी दिली.पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक शेख करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा