Subscribe Us

header ads

बीड जिल्हा प्रहार संघटनेची बैठक संपन्न; जिल्हाधिकारी बीड यांना विविध मागण्यांचे निवेदन

बीड स्पीड न्यूज 



बीड जिल्हा प्रहार संघटनेची बैठक संपन्न; जिल्हाधिकारी बीड यांना विविध मागण्यांचे निवेदन 



किल्ले धारूर प्रतीनीधी-: बीड जिल्हा प्रहार संघटनेची जिल्हास्तरीय बैठक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज शासकिय विश्राम गृह बीड येथे घेण्यात आली. बैठकीची सुरुवात डॉ . हेलन केंलर यांची जयंती असल्याने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी दिव्यांगांच्या विविध अडी अडचणी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेला 5% निधी अंतोदय योजना घरकुल योजना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होणारी दिव्यांगाची पिळवणूक 

युवडीआयडी कार्ड वाटप व्हेरिफिकेशन न करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.आणि या सर्व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी बीड यांना सादर केले. आणी दिव्यांगांचे ह्रदय सम्राट आदरणीय बच्चु भाऊ कडु यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक तालुक्यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन देखील या बैठकीत करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा दौरा करून सर्व तालुक्यामध्ये बैठका लावून संघटनेची पुन्हा मजबूत बांधणी करुन तालुकास्तरीय दिव्यांगांचे  प्रशन प्रहार संघटनेच्या माध्यमातून सोडवणर असल्याचे रघुनाथ तोंडे यांनी सांगितले कोरोणा महामारीमुळे मागील 

दोन आडिच वर्षांपासून प्रहार संघटनेच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले नसल्यामुळे सर्व प्रहार सैनिकांनी आता इथुन पुढे प्रत्येक दोन महिन्यांत एक बैठक लावण्याचा ठराव घेण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे विक्रम, मोमीन रफिक शेख, विक्रम आटोळे, अंकुश सोनवणे, संजय जाधव, विशाल नाळपे, दत्ता अंधळकर, एकनाथ राठोड, अशोक गायकवाड, संभाजी आणेराव, पदमीण तारडे, मणीशा आगरकर, कुसुम माळी, यांच्यासह बीड जिल्ह्यातील प्रहार पदाधिकारी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा