Subscribe Us

header ads

बीड मध्ये शिवसैनिकांची बंडखोरांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी,

बीड स्पीड न्यूज 


बीड मध्ये शिवसैनिकांची बंडखोरांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी, 

बीड|प्रतिनिधी-: आमदार आणि मंत्र्यांनी केलेल्या बंडखोरीचा निषेध करत बीड मध्ये संतप्त शिवसैनिक सोमवारी रस्त्यावर उतरले. बंडखोरांच्या विरोधात घोषणाबाजी करत प्रतिकात्मक फोटोची मोडतोड केली.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी शक्ती 

प्रदर्शन केले. बीड मध्ये जिल्हाप्रमुख अनिल जगताप, आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक थेट रस्त्यावर उतरले. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी करणारे मंत्री आणि आमदार यांच्या विरोधात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. बीड शहरात अण्णाभाऊ साठे चौकामध्ये बीड 

तालुका कार्यकारिणीच्या वतीने शिवसैनिक रस्त्यावर उतरून संतप्त झाले होते.शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी केली. शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. प्रचंड घोषणाबाजीने संपूर्ण बीड शहेर दणाणून गेला. बीड शहरातील आंदोलनात यावेळी माजी 

जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, किसान सेनेचे जिल्हासंघटक परमेश्वर सातपुते, उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप, उपजिल्हाप्रमुख बंडू पिंगळे, सुशिल पिंगळे, आशिष मस्के, मकरंद उबाळे, जिल्हासंघटक बप्पासाहेब घुगे, नितीन धांडे, तालुकाप्रमुख गोरख सिंघण, माजी सभापती सुनील अनभुले, किशोर जगताप, शहरप्रमुख सुनील सुरवसे, रतन गुजर, दीपक काळे, छगन काळे, सखाराम देवकर, प्रदीप माने, प्रदीप कोटुळे, जगदीश उबाळे, अिजक्य पवळ, मुकुंद, कामरान शेख, भालेकर, रामसिंग टाक, मशरू पठाण, विजय जगताप, आकाश जगताप, रोहित चौरे, पिंटू भांडवले यांच्यासह शेकडो शिवसैनिक यात सहभागी होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा