Subscribe Us

header ads

बीड शहरातील मोकाट कुत्र्यांच्या प्रतिबंधते साठी उपाययोजना करा--- नगरसेवक अँड विकास जोगदंड यांची मागणी

बीड स्पीड न्यूज 


बीड शहरातील मोकाट कुत्र्यांच्या प्रतिबंधते साठी उपाययोजना करा--- नगरसेवक अँड विकास जोगदंड यांची मागणी

बीड (प्रतिनिधी) 28 जुन सध्या बीड शहरात व पेठ बीड भागातील काही भागात असंख्य मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून,हे कुत्रे टोळक्याने रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या दुचाकी वाहनांच्या पाठीमागे धाऊन पाठलाग करतात परिणामी वाहनधारकांची तारांबळ उडते व अपघात होण्याची शक्यता बळावते रस्त्यावरून जाणाऱ्या महिला, पुरुष, जेष्ठ,कनिष्ठ, बालक आदी वर हे कुत्रे अंगावर हिंस्त्र पणे धाऊन जाऊन हल्ला चढवत चावा घेतल्याने शहरातील व पेठ बीड भागातील काही भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे नगर परिषदेने गांभीर्याने लक्ष देऊन जनहिताच्या दृष्टीने बीड शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यानां प्रतिबंधित करणे साठी उपाया योजून त्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करून नागरिकांना मोकाट कुत्र्यांच्या त्रासापासून मुक्त करावे. अशी मागणी भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकास जोगदंड यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा