Subscribe Us

header ads

बीड नगर परिषद च्या मतदार यादीत राजकीय स्वार्थासाठी जाणीवपूर्वक गोंधळ - अशोक हिंगे

बीड स्पीड न्यूज 



बीड नगर परिषद च्या मतदार यादीत राजकीय स्वार्थासाठी जाणीवपूर्वक  गोंधळ - अशोक हिंगे                                 


बीड ( प्रतिनिधी ) दि.28 बीड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी काल मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात राजकीय स्वार्थासाठी जाणीवपूर्वक गोंधळ केला असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी चे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी केला आहे.ते पुढे म्हणाले कि प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रभागात जाऊन मतदार यादी तयार करणे गरजेचे होते.एक तर प्रभाग रचनेत मुस्लीम व दलीत जनतेच्या वस्त्यांची जाणीवपूर्वक विभागणी केली. इतकेच काय तर आता एकाच प्रभागात नव्हेतर एकाच कुटुंबातील व्यक्तीचेंही नावे वेगवेगळ्या प्रभागाच्या मतदार यादीत आली आहेत. तसेच घराच्या लगतच्या कुटुंबाची नावे दुसऱ्या प्रभागात आली आहेत. हा सर्व प्रकार तत्कालीन पदाधिकारी यांच्या दबावाखाली करण्यात आला असुन त्याची चौकशी जिल्हा प्रशासनाने करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी व बीड शहरातील सर्व प्रभागाच्या याद्या रद्द करून नवीन याद्या प्रत्यक्ष प्रभागात जाऊन प्रभाग निहाय याद्या तयार कराव्यात अशी मागणी हिंगे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा