Subscribe Us

header ads

अंबाजोगाई आरटीओच्या भोंगळ कारभारा विषयी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे आमरण उपोषणाचा दुसरा दिवस प्रशासन मात्र झोपेत

बीड स्पीड न्यूज 


अंबाजोगाई प्रतिनिधी:-शेख फेरोज

अंबाजोगाई आरटीओच्या भोंगळ कारभारा विषयी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे आमरण उपोषणाचा दुसरा दिवस प्रशासन मात्र झोपेत


अंबाजोगाई प्रतिनिधी-: अंबाजोगाई येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी , उपप्रादेशिक परिहवन कार्यालयातील लर्निग लायसन्स व भ्रष्ट कारभाराच्या विरोधात अन्याय ,अत्याचार ,भ्रष्टाचार विरोधी समितीचे मराठवाडा संपर्क प्रमुख मोहमद ताहेर मो .सत्तार हे दिनांक 5 जुलै पासून आमरण उपोषणाला बसले 

आहेत.याबाबत सविस्तर वृत्त असे की,अन्याय ,अत्याचार ,भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने लर्निग लायसन्स संदर्भातील परिक्षार्थी ऑनलाईन पध्दतीने C.C.T.V. कॅमेरेसमोरील फुटेजच्या हार्ड व सॉफ्ट कॉपीची प्रत पुरविण्यात यावी तसेच सदर परिक्षा पास झालेल्या परिक्षार्थ्याची यादी व सदर परिक्षा अनुउत्तीर्ण झालेल्या परिक्षार्थ्याची यादी देण्यात यावी अशी मागणी वेळोवेळी 

निवेदन,माहिती अधिकार अंतर्गत मागण्यात आली होती.परंतु 1 सप्टेंबर 2019 पासून ते आज दिनांकापर्यंत न दिल्याने व वरील मागण्यावर कसलीही कार्यवाही न केल्याने 01 जुलै 2022 पासून आमरण उपोषणास बसणार होते परंतु काही अडचणीमुळे सदर रोजीचे उपोषण स्थगित झाल्यामुळे ते दि . 04 जुलै पासून दुपारी 1.00 वाजल्यापासून उपप्रादेशिक परिहवन कार्यालया 

समोर आमरण उपोषणास बसत आहे.अशा आशयाचे निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अंबाजोगाई यांना दिलेल्या निवेदनातून म्हंटले आहे. दिं.4 जुलै रोजीचे उपोषण काही कारणांवये दिं.5 जुलै रोजी सुरू झाले आहे असे सांगण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा