Subscribe Us

header ads

रिमझिम पावसात, भक्तिमय वातावरणात, विठ्ठलाच्या जयघोषात माय माइलस्टोन इंग्लिश स्कूल बालकांनी अनुभवली वारकरी दिंडी

बीड स्पीड न्यूज 


रिमझिम पावसात, भक्तिमय वातावरणात, विठ्ठलाच्या जयघोषात माय माइलस्टोन इंग्लिश स्कूल बालकांनी अनुभवली वारकरी दिंडी

बीड|प्रतिनिधी-: शहरातील माय माइलस्टोन इंग्लिश स्कूल येथे आषाढी एकादशी निमित्त शनिवारी (दि. ९) वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात अाले हाेते. रिमझिम पावसात, भक्तिमय वातावरणात, विठ्ठलाच्या जयघोषात 
माय माइलस्टोन इंग्लिश स्कूल बालकांनी दिंडी अनुभवली.दरवर्षाप्रमाणे माय माइलस्टोन इंग्लिश स्कूल 

येथे आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडीचे आयोजन केले जाते. मागील दाेन वर्षामध्ये काेराेना संकट असल्याने स्कुल सुरु झाल्या नाही. यंदाच्या वर्षी स्कुल सुरू झाल्याने पालकांमधूनही माेठ्या उत्साहात मुलांना विठ्ठला-रुक्माई च्या वेशाभूषा साकारली. शनिवारी सकाळी ८.३० पासून पावसाच्या सरी सुरू असतानाही 

पालकांनी स्कुलच्या वारकरी दिंडीत मुलांना सहभागी करण्यासाठी दाखल झाले. ९ ते ११.३० वारकरी दिंडी पावसाच्या हजेरीमध्ये बालकांनी उत्साहामध्ये विठ्ठला-रुक्माई नावाचा जयघाेष करुन अानंद घेतलंा. देवयानी वाढे रुक्माई च्या वेशभूषेत, देवांश वाढे विठ्ठलाच्या अाकर्षक वेशभूषा साकारली हाेती. वारकरी दिंडी 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्कुलचे संचालक ज्ञानेश्वर तांबे, प्राचार्या सारिका जगताप, शिक्षिका नम्रता तांबे, रोहिणी गीते, तनवीर शेख, माधुरी कोरे, प्रीती लामतुरे, अंजली पोपळे, पल्लवी ढाकणे, आशा चव्हाण, माधुरी तांबे, स्वाती लोणके, संध्या जाधव अादींनी पुढाकार घेतला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा