Subscribe Us

header ads

परळी न.प. निवडणूक एमआयएम समविचारी पक्षांना सोबत घेऊन पूर्ण ताकतीने लढवणार तालुकाध्यक्ष शेख शरीफ भाई

बीड स्पीड न्यूज 


परळी न.प. निवडणूक एमआयएम समविचारी पक्षांना सोबत घेऊन पूर्ण ताकतीने लढवणार तालुकाध्यक्ष शेख शरीफ भाई



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) सध्या होऊ घातलेल्या परळी नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून या निवडणुकीमध्ये एम आय एम पूर्ण ताकतीने उतरणार असून वेळप्रसंगी समविचारी पक्षांना सोबत घेऊन नगरपालिका जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. गेल्या दहा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात असणारी नगरपरिषद पूर्णपणे बोगस कारभार करून जनतेंना नाहक त्रास देण्याचे काम झालेले आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून एकही जनहिताचे काम  झालेलं नसून लोकांच्या हितासाठी व अन्याय अत्याचार भ्रष्टाचार संपवण्यासाठी एमआयएम समविचारी पक्षांना सोबत घेत आघाडी करून पूर्ण ताकतीने नगर परिषदेची निवडणूक लढवणार आहे. अशी माहिती एमआयएमचे तालुका अध्यक्ष शेख शरीफ भाई यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून परळी शहरांमधील रहदारीच्या व दाट वस्तीतील भागामध्ये पूर्णपणे ड्रेनेजच्या कामासाठी रस्ते खोदलेले असून लोकांना वाहनातून सोडा पायी चालणं सुद्धा शक्य नाही याचा नगरपरिषदेच्या व सत्ताधाऱ्यांच्या बोगस कामामुळे ही जनसामान्यांवर वेळ आली असून अशा भ्रष्ट व बोगस काम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना घरी बसवण्याची वेळ आलेली आहे. लोकांनी अशा भ्रष्ट कारभारी लोकांना घरी बसून नवीन लोकांना व स्वच्छ कारभार जनतेसाठी धावून येणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडून देऊन आपले हक्काचे प्रतिनिधी सभागृहात  पाठवण्यासाठी एमआयएम येणारी नगरपरिषद  समविचारी पक्षांना सोबत घेऊन आघाडी तयार करून लढवणार असल्याची माहिती एमआयएमचे तालुकाध्यक्ष शेख शरीफ भाई यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा