बीड स्पीड न्यूज
मुलगी नको म्हणून विवाहितेचा जबरदस्तीने केला गर्भपात; पती, सासू, डॉक्टरसह अन्य एकावर गुन्हा!
गर्भपाताचे टोचले इंजेक्शन
जुलै महिन्यात सरस्वती आजारी पडली. तिला ताप, उलट्याचा त्रास होऊ लागला. १५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता सासूचा मेहुणा प्रकाश कावळे हा पुन्हा डॉ. स्वामीला घेऊन घरी आला. यावेळी सुद्धा पती, सासू, डॉक्टर आणि प्रकाश यांच्यात गर्भपात करण्यासंदर्भात कुजबुज सुरु होती. त्यानंतर डॉ. स्वामीने पुन्हा सोनोग्राफी केली. तापेसाठी इंजेक्शन देत आहे असे सरस्वतीला सांगत त्याने तिला गर्भपाताचे इंजेक्शन टोचले आणि प्रकाशसोबत तिथून निघून गेला. त्यानंतर एक-दिड तासाने तिला पोटदुखीचा त्रास सुरु झाला आणि विश्वासघाताने गर्भपाताचे इंजेक्शन टोचण्यात आल्याचे तिने ओळखले. सरस्वतीने ताबडतोड पुणे येथे राहणाऱ्या भावाला मेसेज करून सर्व माहिती दिली. माझा जबरदस्तीने गर्भपात करणार आहेत, तू लवकर ये असेही तिने भावाला सांगितले.
तुकडे करून गर्भ काढला बाहेर
इंजेक्शन दिल्यानंतर सरस्वतीला होणारा तरास काही कमी होत नव्हता. त्यामुळे १६ जुलै रोजी पहाटे १.३० वा. डॉ. स्वामी पुन्हा तिच्या घरी आला त्याने सरस्वतीची तपासणी केली. पिशवीला छिद्र करून गर्भ काढावा लागेल असे त्याने सांगितले. यावेळी देखील माझा गर्भपात करू नका अशी विनवणी सरस्वती वारंवार करत होती. मात्र, सर्वांनीच तिच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर सासूने तिचे हात पकडले आणि डॉ. स्वामीने अक्षरशः गर्भ कापून तुकडे करून बाहेर काढला. त्यानंतर पती, सासू आणि प्रकाश कावळे हे विल्हेवाट लावण्यासाठी तो गर्भ घेऊन निघून गेले. झालेल्या प्रकाराबद्दल कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी त्यांनी सरस्वतीला दिली.
चौघांवर गुन्हा
१६ जुलै रोजी सकाळी सरस्वतीचा भाऊ आला. पती, सासू यांना विनंती करून रात्री तो सरस्वतीला घेऊन पुण्याला गेला.गर्भपात झालेला असल्यामुळे तिथेही तिला खूप शारीरिक त्रास झाला. अखेर तिने पोलीस ठाणे गाठून झालेल्या प्रकाराविरोधात फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून पती नारायण वाघमोडे, सासू छाया वाघमोडे, डॉ. स्वामी आणि प्रकाश कावळे या चौघांवर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात कलम ३१३, ३१५, ३१८, ३४, ४९८-अ, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
0 टिप्पण्या