Subscribe Us

header ads

"मुझे बनना है यूपीएससी टॉपर" पुस्तक जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना भेट

बीड स्पीड न्यूज 

"मुझे बनना है यूपीएससी टॉपर" पुस्तक जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना भेट 



बीड (प्रतिनिधी) - शहरातील नॅशनल उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य तथा लेखक सिद्दिकी नवीद यांनी यूपीएससी च्या विद्यार्थ्यांना महत्त्वाचे "मुझे बनना है यूपीएससी टॉपर" हे उर्दू पुस्तक जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना सप्रेम भेट दिले. यावेळी सिद्दिकी नवीद यांनी या दोन्ही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना युपीएससी विषयी हे पुस्तक कसे लाभदायी आहे सांगितले. यावर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनीही सिद्दिकी नवीद यांच्या अभ्यासपूर्ण आकलनाने तयार केलेल्या या पुस्तकाचे कौतुक केले. तसेच आतापर्यंत इंग्रजी व मराठी माध्यमातून यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी बाजारात अनेक प्रकारची पुस्तके मिळतात परंतु फक्त उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आपण जो प्रयत्न केला तो निश्चितच कौतुकास्पद आहे. या पुस्तकाचे उर्दूतून शिक्षण घेणाऱ्या व यूपीएससी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होईल असे म्हटले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा